#

Advertisement

Tuesday, May 9, 2023, May 09, 2023 WIB
Last Updated 2023-05-09T12:57:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

...म्हणून शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही

Advertisement

मुंबई : राज्यातील आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय  केव्हाही लागू शकतो. या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी महत्त्वाचं वक्तव्य केल आहे.. निलंबनाचा अधिकार फक्त अध्यक्षांना असून कोर्ट, अन्य संस्थांना अधिकार नाही, असं महत्त्वाचं विधान राहुल नार्वेकरांनी केलं आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही 
कोर्टाचा निकाल विरोधात लागून सरकार पडेल असा दावा मविआ नेत्यांकडून केला जात आहे. पण निलंबनाचा अधिकार फक्त अध्यक्षांना असून कोर्ट, अन्य संस्थांना अधिकार नाही, असा दावा नार्वेकरांनी केला आहे. विधानसभेचे जे नियम आहेत त्यावर मी बोलतो. जेव्हा अध्यक्ष नसतात तेव्हा त्यांचे अधिकार उपाध्यक्ष यांच्याकडे चार्ज असतो पण जेव्हा अध्यक्ष असतात तेव्हा चार्ज थेट अध्यक्षाकडे असतो. निलंबनाबाबत कारवाई केवळ विधानसभा अध्यक्ष करू शकतात. जोवर अध्यक्ष याचिकावर निर्णय देत नाही तोवर कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही असा कायदा सांगतो, असंही नार्वेकर म्हणाले.