#

Advertisement

Monday, May 29, 2023, May 29, 2023 WIB
Last Updated 2023-05-29T09:20:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे !

Advertisement

जळगाव : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आडनावावर काही मराठा संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर राज्यात नवा वाद सुरु झाला. गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव वापरु नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. या प्रकरणावर आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. महिलांनी आपले गुण व कतृत्व दाखवायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोक सुद्धा पाटील आडनाव लावतात. त्यामुळे पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे. कलाकारांना सुरक्षा मिळायला पाहिजे, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे.