#

Advertisement

Monday, May 29, 2023, May 29, 2023 WIB
Last Updated 2023-05-29T09:12:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजितदादांनी हॉटेल मालकाला उभं केलं शॉवर खाली

Advertisement


पुणे : भोरमध्ये शनिवारी  एका हॉटेलच्या उद्घाटनादरम्यान कार्यकर्त्याला झापण्याच्या भूमिकेत वावरणारे अजित पवार याचा प्रत्यय आला. निमित्त होते अजितदादांच्या हस्ते एका हॉटेल उद्घाटनाचे. पण, फित कापल्यानंतर अजितदादांनी त्या हॉटेलच्या बांधकामाची बारकाईने पाहणीही केली. त्यात दादांना बाथरूम शॉवरचा हेडस्पेस कमी जाणवला. यानंतर त्यांनी थेट हॉटेल मालकालाच शॉवर खाली उभं केलं आणि बाथरूमचा हेडस्पेस किती कमी हे उदाहरणासह दाखवून दिलं. दादांची कृती पाहून कार्यकर्त्यांची जोरदार करमणूक झाली खरी पण दादांना उद्घाटनाला बोलावणाऱ्या हॉटेल मालक कार्यकर्त्यांची पुरती शोभा झाली. यानंतर हॉटेल मालकासह तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनाही हसू आवरलं नाही.