Advertisement
मोहळ विधानसभेसाठी चर्चेतील सर्वात आघाडीचे नाव
मोहोळ : लोकसभा आणि विधानसभा 2024च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर "इच्छुक' उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मतदार संघ, आरक्षण तसेच राजकीय हवा आणि आपल्याला जो राजकीय पक्ष सोयीस्कर ठरेल त्या पक्षाच्या वरिष्ठांकडे उमेदवारीसाठी आतापासून फिल्डिंग लावण्याचे काम सुरू झाले आहे. अशा इच्छुक उमेदवारांमध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचेही नाव घेतले जात आहे. विशेष म्हणजे ढोबळे यांच्या निकटवतीयांकडूनच ऍड. कोमल यांचे नाव "जनतेच्या मनातील आमदार' म्हणून सातत्याने पुढे केले जावू लागले आहे. तर, ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्याकडून मात्र ढोबळे साहेब म्हणतील तसं.., असे उत्तर देत मिळत असल्याने ढोबळे यांच्यापैकी सोलापूर लोकसभा कोण लढणार? मोहोळ विधानसभा कोण लढविणार? अशीच चर्चा सध्या सोलापुरात सुरू आहे. जनेतेचा कल मात्र ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्या बाजुनेच असल्याचे गेल्या कित्येक सार्वजनिक कार्यक्रमातील प्रतिसादातून स्पष्ट झाले आहे.भाजपचे प्रांतीय सदस्य मात्री मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि त्यांच्या कन्या ऍड. कोमल साळुंखे यांनी नुकतीच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. ढोबळे साहेंब हे ही कन्या ऍड. कोमल साळुंखे यांना सक्रिय राजकारणात "प्रमोट' करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मंत्री ढोबळे हे सध्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत. ते भाजपात असले तरी त्यांची कन्या ऍड. साळुंखे या बहुजन रयत परिषदेचे काम पाहत आहेत, त्यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यापूर्वी त्यांचे वडील अर्थात लक्ष्मण ढोबळे यांनी मोहोळ विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. ढोबळे यांच्या अनेक संस्था मोहोळ तालुक्यात आहेत. बहुजन समाज आणि महिलावर्गासाठी ऍड. कोमल यांनी मोठे काम केले आहे. त्या साततत्याने सक्रिय असल्याने विजयासाठी आवश्यक असलेला विशिष्ट मतांचा आकडा त्यांनी तयार ठेवला आहे, याशिवाय माजी मंत्री ढोबळे यांचा राजकारणातील अनुभव तसेच त्यांच्या आजपर्यंत केलेल्या कामाचाही फायरदा ऍड. कोमल साळुंखे यांना होऊ शकतो.
मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा सध्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. सध्या, ऍड. कोमल साळुखे या बहुजन रयत परिषदेचे काम करीत आहेत. तर, माजी मंत्री ढोबळे हे कन्येला पुढे करून राजकीय वचपा काढण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. ते आपली संपूर्ण ताकद कन्येच्या पाठीशी लावणार, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे ऍड. साळुंखे यांची राजकीय भूमिका नेमकी काय असणार, हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. सोलापूर लोकसभा ही आपल्यासाठी सोयीची आहे. मात्र, त्यासाठी भाजपने आपल्याला संधी दिली तर सोलापूरची लोकसभाही पूर्ण ताकदीने लढू असा निश्चयही ढोबळे कुटुंबाकडून व्यक्त केला आहे. कदाचित लोकसभा वडील लक्ष्मणराव आणि विधानसभा कन्या ऍड. कोमल साळुंखे असेही चित्र आगामी काळात दिसू शकते.
