Advertisement
ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे "वडील चांगली प्रतिक्रीया देतील', सूचक वक्तव्य
पुणे : माजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपदाच्या निवृत्तीची घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केल्यानंतर राज्याच्याच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातही खळबळ उडाली आहे. याबाबत अनेकांकडून विविध प्रतिक्रिया येत असताना याबाबत महाराष्ट्र राज्यात शरद पवार यांनी "सावली' म्हणून कधीकाळी प्रसिद्ध असलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या तथा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी अधिक बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून माझे वडील ढोबळे साहेबांची ओळख आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी असा त्यांचाही प्रवास राहिला आहे. पक्षाच्या राजकीय चढउतारात पवार साहेबांना ढोबळे साहेंबानी मोठी साथ दिली. मी लहान असल्यापासून वाडीलांबरोबर पवार साहेबांची राजकीय कारकिर्द पाहिली आहे. 2013 साली आदरणीय पवारसाहेब बोलले असते तर आज कदाचित मनाविरूद्ध हा निर्णय घेण्याची वेळ आली नसती. आमचे आराध्य प्रा. लक्ष्मणराव ढोबळे साहेबांना आणि आदरणीय पवारसाहेबांच्या जवळची विश्वासू फळी पक्षातून अर्थात अदरणीय पवारसाहेबांपासून लांब करण्याहेतूने ज्या घडामोडीं झाल्या त्यावर आदरणीय पवारसाहेबांनी मौन बाळगले. आजचा जो दिवस आपण बघतोय या दिवसाची पहिली पायरी 2013ला मांडली गेली. माझ्या माहितीनुसार खरं तर आदरणीय पवारसाहेबांचा घराणेशाहीला फारसा पाठिंबा नव्हता. पण, पक्षातल्याच काही नविन नेत्यांनी नविन म्हणजे इतक्या नविन की, आदरणीय ढोबळे साहेबांसमोर शाळेत जाणाऱ्या "लक्ष्मी भगत' बालनेत्यांनी पक्षाचे नको ते निर्णय घेण्यात ढवळाढवळ चालू केली होती. वेळीच कानउघडणी झाली असती तर आदरणीय पवारसाहेबांना पोटच्या मुलाप्रमाणे असणाऱ्या पक्षाच अध्यक्षपद सोडण्यापर्यंत निर्णय घ्यावा लागला नसता. खरं तर, पवार साहेबांच्या एवढ्या मोठ्या निर्णयावर मी प्रतिक्रिया देण्याऐवढी मोठी नाही. पण, वडील ढोबळे साहेब चांगली प्रतिक्रिया देऊ शकतील, असे सूचक वक्तव्य ऍड. कोमलताई यांनी केले आहे.
