Advertisement
मुंबई : पुणे "लोकसभा" पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र!' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी आपलं हे ट्विट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टॅग केलं आहे.
दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीकडून वारंवार पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवर दावा करण्यात येत आहे. अजित पवार यांनी पुण्याच्या पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया देताना पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरवताना महाविकास आघाडी अंतर्गत चर्चा करू असं म्हटलं आहे. निवडणुकीची रणनिती ठरवताना जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या या नव्या ट्विटमुळे आता पुण्याची जागा राष्ट्रवादीला जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
