#

Advertisement

Monday, May 29, 2023, May 29, 2023 WIB
Last Updated 2023-05-29T09:00:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा ?

Advertisement

पुणे :  पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. त्यामुळे लोकसभेची ही जागा राष्ट्रवादीला देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, येत्या दोन जून रोजी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये  या जागेबाबत निर्णय घेतला जाईल, असं  काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक येत्या दोन जून रोजी होणार आहे, या बैठकीमध्ये  या जागेबाबत निर्णय घेतला जाईल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान जनताच जमालगोटा देऊन विरोधकांच्या पोटदुखीचा इलाज करेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावरून अशोक चव्हाण यांनी जोरदार टोला लगावला आहे, मुख्यमंत्र्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नसल्याचं त्यांनी म्हटलं. पुण्याच्या पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त आहे तिथे त्यांना प्राधान्य दिले जाईल. पुणे शहर व जिल्ह्यात नेहमीच आमची ताकद राहिली आहे. त्यामुळे ती जागा कोणाला सोडणे हा वाद होऊ शकत नाही. निवडणुकीची रणनिती ठरवताना जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.