Advertisement
| चौंडी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे 298व्या
जयंती सोहळ्याचे आयोजन शासनाकडून करण्यात आले होते. राज्यभरातून नागरिक येथे आलेले असताना
मंगळवेढा-मोहोळमधून 20 गाड्यांपेक्षा अधिक वाहनांतून 200 पेक्षा अधिक बांधवांचा
ताफा चौंडी येथे दाखल झाला होता. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंदन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार गोपीचंद पडळकर, राम कदम आदी उपस्थित होते. यावेळी हजारो बांधवांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही संबोधीत केले. आपल्या वाणीने त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विषयी माहिती देत त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला. | |||
