#

Advertisement

Wednesday, May 31, 2023, May 31, 2023 WIB
Last Updated 2023-05-31T16:49:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बीड जिल्ह्यात मुंडे बहिण-भावाची लढत ?

Advertisement

बीड  : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात मुंडे बहिण-भावाची लढत पाहायला मिळू शकते. यावर खासदार प्रितम मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासमोर विरोधी पक्षाला उमेदवार मिळत नाहीं मी डॉन तर नाही. मै गुंडी तो नहीं हू ना? म्हणत खासदार प्रितम मुंडे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे.
प्रितम मुंडे, म्हणाल्या, धनंजय मुंडे यांना पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तरीही काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत राहिली आहे. लोकसभेसाठी विरोधी उमेदवार हा चांगला असावा, आपल्याला प्रेरणा मिळते. राष्ट्रवादीला अजून उमेदवार निश्चित करता आला नाही. त्यामुळे लोकसभेची निवडणूक अर्धी आपण जिंकलेली आहे. तगडी फाईट होईल असा उमेदवार मिळाला तर मला आनंद वाटायला हवा. पण मला आनंद वाटत नाही. त्यांना पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी समोर लढवायच ठरवलं तर काही नाही, असं म्हणत प्रितम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिले आहे.