#

Advertisement

Monday, May 22, 2023, May 22, 2023 WIB
Last Updated 2023-05-22T11:39:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

गौतमी पाटीलच्या 'कातिल अदा' आता पडणार भारी

Advertisement

सांगोला  :  महाराष्ट्रातील  सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आबा मोटे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणाईची हुल्लडबाजी पाहाता सांगोल्यातील कार्यक्रमात तगडा पोलीस बंदोबस्त  ठेवला गेला होता. यात तब्बल 106 पोलीस आणि अधिकारी तैनात होते. पोलीस बंदोबस्ताच्या खर्चापोटी आबा मोटे यांनी पाच लाख रुपये पोलीस स्टेशनला जमा केले.  गौतम पाटीलच्या कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी, वाद आणि मारहाण असे प्रकार सर्रास होताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबरोबरच पेड पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यासाठी कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांना पैसै द्यावे लागणार आहेत. म्हणजेच गौतमीच्या मानधनापेक्षा दुप्पट रक्कम पोलीस बंदोबस्तासाठी भरावी लागणार आहे.