#

Advertisement

Monday, May 22, 2023, May 22, 2023 WIB
Last Updated 2023-05-22T11:21:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माझ्या कार्यकर्त्यांचा मला सार्थ अभिमान : लक्ष्मणराव ढोबळे

Advertisement



मंगळवेढा : सध्या नेते मंडळींचा वाढदिवस साजरा करायचा म्हणजे जत्रा भरवायची, तमाशा ठेवायचा असा काही होरा पडला आहे. पण, माझ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामाजिक भान ठेऊन कार्यक्रमांचे आयोजन केले, उपक्रम राबविले याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मंगळवेढ्याची संस्कृती माझ्या कार्यकर्त्यांनी जपली त्याबद्दल शतश: धन्यवाद, अशा शब्दांत माजी आमदार, माजी मंत्री ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी वाढदिवसानिमत्त केलेल्या सत्काराला उत्तर दिले.
सोलापूर जिल्ह्याचे शब्दप्रभू म्हणून परिचीत असलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सत्कार समारंभासह काव्य संमेलन, मराठी गीतांचा कार्यक्रम, नामवंत मल्लांच्या कुस्तीचा आखाडा आदी उपक्रमांचे आयोजन शाहू शिक्षण संस्था, बहुजन रयत परिषद व सावली फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते. मारुतीच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात सत्काराला उत्तर देताना माजी मंत्री ढोबळे यांनी सामाजिक भान ठेवणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून कौतूक केले. सध्या, तमाशा करून नाचायला लावायची पद्धत रूढ झाली आहे. परंतु, मंगळवेढ्यातील माझ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अशा मनोवृत्तीला फाटा दिला. जे काही कार्यक्रम आयोजीत केले त्यातून खरोखरच समाजाला काही ना काही बोध मिळाला, याबद्दल समाधान वाटते. मी घडवलेले कार्यकर्ते वाया गेलेले नाहीत, ते मंगळवेढ्याची संस्कृती जाणतात, याचा मला सार्थ अभिमान असल्याचेही ढोबळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
दरम्यान, माजी मंत्री ढोबळे यांच्या वाढदिवसानिमत्त ग्रामस्वच्छता अभियानावर आधारित "वास इस दास' ही प्रबोधनात्मक नाटीका, कवी संमेलनात नारायण पुरी, अविनाश भारती, शिवाजी बंडगर, अनंत राऊत, खलील मोमीन, डी.के.शेख, नितीन चंदनशिवे, भरत दौंडकर, शिवाजी सातपुते, रमजान मुल्ला आणि तालीब यांच्या विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता, सलील कुलकर्णी यांच्या मराठी गितांचा मराठमोळा कार्यक्रम, अन्नदान, वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धेसह जंगी आघाड्याचे आयोजन करण्यात आले होते.