#

Advertisement

Saturday, May 27, 2023, May 27, 2023 WIB
Last Updated 2023-05-27T08:21:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मविआत बिघाडी ? काँग्रेस आक्रमक; अजितदादांना सुनावलं

Advertisement

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघ खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झाला आहे. या जागेवर निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र या पोटनिवडणुकीवरून पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जात असतानाही वारंवार राष्ट्रवादीकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. यावरून आता काँग्रेसनं देखील राष्ट्रवादीला चांगलंच सुनावलं आहे. 
महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाते. मात्र या जागेवर राष्ट्रवादीकडून देखील दावा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलेल्या दाव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील दावा केला आहे. अजित पवार यांच्या दाव्यानंतर काँग्रेस चांगलंच आक्रमक झालं आहे. काँग्रेसनं आपली भूमिका मांडताना राष्ट्रवादीला सुनावलं आहे. ही जागा काँग्रेसची आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच ही जागा लढवणार असल्याचं काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एक्य राहणं गरजेचं आहे, आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.