#

Advertisement

Friday, May 26, 2023, May 26, 2023 WIB
Last Updated 2023-05-26T11:49:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"द पॉवर ऑफ सोलापूर वूमन' एकत्र येणार

Advertisement

सोलापूर : सोलापुरात जुन महिन्याच्या पहिल्या तारखेला (ता.1) "द पॉवर ऑफ सोलापूर' या विशेष गौरव पुरस्कार सोहळ्यात सोलापुरातील "द पॉवर ऑफ सोलापूर वूमन' एकत्र येणार आहेत. एका वृत्तपत्राकडून सोलापूरचा नावलौकिक कृषी, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, संशोधन, वैद्यकीय, बॅंकिंग अशा क्षेत्रात वाढविणाऱ्या प्रतिभावान महिलांचा विशेष सन्मान करण्यात येत असताना राजकीय महिलांचाही सन्मान होत आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या तथा सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदे आणि सोलापुरच्याच राजकारणातील "शब्दप्रभू' यांच्या कन्या असलेल्या उमेद्यानेत्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे या दोघी एकाच व्यासपीठावर असणार आहेत. जुन्या काळातील सोलापुरच्या राजकारणातील मातब्बर म्हणून सुधीरकुमार शिंदे यांचे तसेच प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे नाव घेतले जाते. या दोघाही नेत्यांना कॉंग्रेसी संस्कृतीची पंरपरा लाभलेली आहे. शरद पवार यांच्यासोबत या दोघा नेत्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील अनेक चढउतार पाहिले या दोघांच्या "कारकिर्दीचे बालपण' त्यांच्या कन्या असलेल्या प्रणिती आणि कोमल यांनीही त्यांच्या बालवयात पाहिले आहे.
सोलापुरात प्रणिती शिंदे या राजकारणात लवकरच सक्रीय झालेल्या असताना कोमल ढोबळे या मात्र शिक्षण संस्था, बचत गट अशा सामाजिक कामांत रमल्याने त्यांची "एन्ट्री' राजकारणात होऊ शकली नाही. परंतु, बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून तसेच वडीलांचा भक्‍कम पाठिंबा मिळत असल्याने कोमल ढोबळे याही आता राजकारणात स्थिरावू पाहत आहेत. विशेष म्हणजे आगामी 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी या दोघींचीही नावे त्या-त्या राजकीय पक्षांकडून आघाडीवर असताना महिला पुरस्कार सोहळ्या निमित्त त्या एकाच व्यासपिठावर येत आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सध्या खासदारकीसाठी विधानसभेला हॅट्रिक साधणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना खुद्द कॉंग्रेस पक्षातूनच मात्र याला विरोध होत आहे. तर, सुशीलकुमार शिंदे यांनीच 2024ची लोकसभा लढवावी, अशी मागणी पक्षातून होत आहे. तर, सोलापूर लोकसभा सलग जिंकण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे काही नेते प्रयत्नशील आहेत. परंतु, कॉंग्रेस पक्षा हा आमचा "श्वास' आणि 'ध्यास' असून आपण कॉंग्रेस पक्ष कधीच सोडणार नसल्याचे सांगत प्रणिती शिंदे यांनी भाजपमध्ये जाण्यास थेट नकार दिला आहे. याच कारणातून सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडून आता आमदार प्रणिती शिंदे यांच्या एवढा सक्षम तुलनात्मक चेहऱ्याचा शोध भाजपकडून घेतला जात आहे. यापार्श्‍वभूमीवर आरक्षीत जागा, दलित समाज असे काही मुद्दे लक्षात घेतले जात आहेत. यानुसार अशा सर्वच आघाड्यांवरील एक चेहरा म्हणून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्याकडे पाहिले जात आहे. जेवढी क्रेझ सोलापुरात प्रणिती शिंदे यांची आहे त्याच तुलनेत ऍड. कोमल याही तरूणाईमध्ये प्रसिद्ध आहेत.
सोलापुरातील ही राजकीय बाब लक्षात घेता हे दोन्ही चेहरे एकाच व्यासपिठावर येणार असल्याने ते काय बोलणार याकडे सोलापुरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.