Advertisement
नागपूर : 'राहुल गांधी जेव्हा म्हणतात मी सावरकर नाही. तेव्हा मला वाटतं राहुल गांधींची ती औकाद नाही, मी औकद शब्द वापरला तर लोक वेगळा अर्थ काढतात पण नागपुरात त्याला क्षमता म्हणतात. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले त्यामुळे राहुल गांधींना सावरकर समजणार नाही' असं म्हणत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
मृत्युंजयाचा आत्मयज्ञ या कादंबरीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. मी कधी कधी विचार करतो राहुल गांधींची आभार मानणे पाहिजे. जेव्हा जेव्हा समाज सावरकर यांना विसरतो तेव्हा राहुल गांधी बोलतात आणि लोक पेटून उठतात. भारतीय समाज आवाहन आल्यावर पेटून उठतात. ही कादंबरी लिहिली या साठी लेखिकेचे आभार मानायचे की राहुल गांधीचे हे मला समजत नाही. राहुल गांधी तुम्ही जन्मात सावरकर होऊ शकत नाही, त्यांच्या केसाची देखील ते बरोबरी करू शकत नाही, अशी टीका फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली.
