Advertisement
नागपूर : महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण यावरुन चर्चा सुरु आहे. याच संदर्भात अजित पवारांनी कोल्हापुरातील मेळाव्यात राष्ट्रवादीच महाविकास आघाडीत मोठा भाऊ असल्याचे म्हटलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठिंबा दिला आहे.
आपण महाविकासआघाडीचे घटकपक्ष आहोत. महाविकासआघाडी मजबूत ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. पण तुमची जास्त ताकद असेल तर तुम्हाला महत्त्व दिलं जाईल. याआधी प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जागा आपल्यापेक्षा जास्त असायच्या. आम्हाला बार्गेनिंग करताना लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यायला लागायची. आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत, कारण ते 44 आहेत आम्ही 54 आहोत आणि उद्धव ठाकरेंची सेना 56 होती', असं अजित पवार म्हणाले होते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी अजितदादांच्या या वक्तव्याच्या सूरात सूर मिसळला आहे. महाविकासआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस सध्या मोठा पक्ष आहे, असं मोठं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
