#

Advertisement

Monday, May 22, 2023, May 22, 2023 WIB
Last Updated 2023-05-22T16:16:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

जयंत पाटील यांची ईडीकडून तब्बल साडेनऊ तास चौकशी

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. जयंत पाटील सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात गेले होते. त्यानंतर 9.30 वाजता ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटलांची आज ईडीने चौकशी केली. L&FS कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. IL&FS प्रकरणात एकाच व्यक्तीला अनेक कंत्राटं मिळाली? कंत्राटं मिळालेल्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा संशय आहे. तसंच IL&FS प्रकरणात याआधी अनेकांची नावं समोर आलीत. या प्रकरणाच्या तपासासाठी जयंत पाटलांची ईडी चौकशी करण्यात आली आहे.