#

Advertisement

Wednesday, May 31, 2023, May 31, 2023 WIB
Last Updated 2023-05-31T16:39:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अहिल्यादेवी नगर नामांतर श्रेय घेऊ नये : आमदार रोहित पवार

Advertisement

अहमदनगर : अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या घोषणेचे स्वागत केलं आहे. पण त्याचं श्रेय कुठल्या एका व्यक्तीने किंवा एका पक्षांना घेऊ नये, याच्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले असल्याचे रोहित पवार म्हणाले. 
अहमदनगर जिल्ह्याचे नाव हे अहिल्यानगर केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, आम्ही या गोष्टीचं स्वागत करतो. कोणताही जातीय धार्मिक व्यवहार न बाळगता सामान्यांच्या हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काम केलं आहे. त्यांचा जन्म चौंडी या ठिकाणी झाला आणि जिल्ह्याचे नाव हे त्यांच्या नावाने दिलं असेल तर त्याचे स्वागत आहे. पण त्याचं श्रेय कुठल्या एका व्यक्तीने किंवा एका पक्षांना घेऊ नये याच्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत.