Advertisement
मुंबई : आम्ही कायदेशीर चौकटीत बसून सरकार स्थापन केलं. सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे अनेक लोक यापूर्वी घटनाबाह्य सरकार बेकायदेशीर सरकार म्हणून स्वत:ची पाठ थोपटत होते. मात्र, त्यांना आज मोठी चपराक दिली असून कालबाह्य केलं आहे, सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिला यावर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया आहे.
शिंदेम्हणाले की, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. या देशान संविधान आहे, कायदा आहे, नियम आहे. त्याच्याबाहेर कुणालाही जाता येणार नाही. आम्ही जे सरकार स्थापन केलं ते पूर्णपणे कायदेशीर चौकटीत बसून सरकार स्थापन केलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो. डिसक्वालिफिकेशनचा अधिकार अध्यक्षांना आहे, अशी आमची भूमिका होती. हे अधिकार कोर्टाने अध्यक्षांकडे दिले. निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली, धनुष्यबाणही दिला. पॉलिटिकल आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी यावरही कोर्टाने भाष्य केलं आहे.
