Advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. उद्या (गुरुवारी) सुप्रीम कोर्टामधून निकाल येण्याची शक्यता आहे. शिंदे-फणडवीस सरकारचं भविष्य उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे वकिलांसोबत तातडीनं दिल्लीला रवाना झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयात गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिल्याचेही सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे वकिलांसोबत तातडीनं दिल्लीला रवाना झाले. खासदार राहुल शेवाळे थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई दिल्लीकडे काही वेळात होणार रवाना होणार आहे. आज रात्री दिल्लीत पोहचणार आहेत.सरीकडे शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल देसाई देखील दिल्लीला रवाना झाले आहेत.
