#

Advertisement

Tuesday, May 9, 2023, May 09, 2023 WIB
Last Updated 2023-05-09T12:31:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मविआ लोकसभा एकत्र लढणार ? शरद पवार घेणार पुढाकार

Advertisement

पुणे : मविआ आगामी लोकसभेत एकसंघपणे लढली तर भाजपचा दारूण पराभव होणार, असं सर्वेच सांगताहेत. पण, जागावाटपाचं सूत्र अद्याप ठरलेलं नाही म्हणूनच आता शरद पवारांनी याकामी पुढाकार घ्यायचं ठरवलेलं दिसतं आहे. लोकसभा जागावाटपाच्या मुद्यावर आम्हाला एकत्र बसावच लागेल, असं सांगत बैठकीची तारीखही पवारांनी जाहिर करून टाकली आहे.
काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही लोकसभेची सूत्र लवकरच ठरवलं जाण्याची गरज व्यक्त केली आहे. याउलट शिवसेनेकडून या मुद्यावर अजून कोणीच जाहिरपणे पुढाकार घेताना दिसत नाही. महीन्याभरापूर्वी मविआचं लोकसभेचं जागावाटपाचं सूत्र ठरल्याच्या बातम्याही पेरल्या गेल्या होत्या. त्यात शिवसेना 21 राष्ट्रवादी 19 तर काँग्रेस 9 असा फॉर्मूला ठरल्याचंही सूत्रांकडून सांगितलं गेलं. पण मविआतील तिन्ही पक्षांनी या बातम्या तिथल्या तिथे फेटाळून लावल्या आहेत.