Advertisement
पंढरपुर : पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या अनेक जुन्या पुरातन घटनांचा उल्लेख इसवी सन 516 मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून आढळतो. याच मंदिरात तो गेल्या 700 वर्षांपासून कटीवरी हात विटेवरी उभा आहे. आता याच मंदिराचं रुप बदलणार आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
पंढपुरातील मंदिराच्या 73.85 कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठल मंदिर, सभामंडप, रूक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव पायरी, नगारखाना आणि इतर छोट्या मंदिरांचा समावेश आहे. विकासानंतर मंदिराला प्राचीन मूळ रुप प्राप्त होणार आहे. मंदिराशी सुसंगत काळ्या किंवा लाल दगडांचा वापर केला जाणार आहे. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा विकास होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गेल्या वर्षी आषाढीची पूजा केली होती. त्यावेळी मंदिर समितीने मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी केली होती. या विकास आराखड्यामुळे मंदिर परिसर आणखी सुंदर होणार आहे आणि मंदिरालाही गतवैभव पुन्हा मिळणार आहे.
