#

Advertisement

Saturday, May 27, 2023, May 27, 2023 WIB
Last Updated 2023-05-27T11:13:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ऍड. कोमलताई सोलापुरातील "पॉलिटीकल पॉवर ऑफ वूमन' : प्रभाकर भैय्यासाहेब देशमुख

Advertisement


पुणे : माजी मंत्री गुरूवर्य मार्गदर्शक शब्दप्रभू माननीय लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या आमच्या मार्गदर्शिका असलेल्या ऍड. कोमलताई या खरोखरच सोलापुरातील "पॉलिटीकल पॉवर ऑफ वूमन' आहेत, अशा शब्दांत जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्यासाहेब देशमुख यांनी ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे कौतूक केले.
सोलापूर आवृत्ती "पुण्यनगरी' परिवारातर्फे "द पॉवर ऑफ सोलापूर' या पुरस्कारासाठी ऍड. कोमलताई यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, नेतृत्व, कर्तुत्व आणि वक्तृत्व या त्रिवेणी गुणांचा संगम असलेल्या कोमलताई यांच्यासोबत आम्ही नेहमीच खंबरीपणे उभे राहू. लक्ष्मणराव ढोबळे साहेबांप्रमाणेच त्या आमच्या मार्गदर्शिका आहेत.
दरम्यान, जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्यासाहेब देशमुख यांचा सन्मान ऑल्म्पीक संघटेनेचे सदस्य अजय साळुंखे, ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केला. यावेळी हभप दिनकर काका पिंगळे गुरूजी उपस्थित होते.