#

Advertisement

Friday, June 23, 2023, June 23, 2023 WIB
Last Updated 2023-06-23T10:47:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बीडमध्ये बहुजन रयत परिषदेच्या एकाच दिवशी 11 शाखांचा दणक्‍यात शुभारंभ

Advertisement

बिड : बीड शहरात बहुजन रयत परिषदेच्या 11 शाखांची स्थापना एकाच वेळी विविध भागात करण्यात आली. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे वेगवान वाटचाल सुरू आहे. त्यांच्या सूचनेनुसार महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी बीडमधील 11 शाखांचा शुभारंभ केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रमेशतात्या गालफाडे यांच्यासह प्रमुख नेते तसेच स्थानिक पदाधिकारी मंडळी उपस्थित होती.
दरम्यान, बीड येथे रमेश गालफाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी बहुजन रयत परिषदेच्या राज्यभरातील कार्याचा आढावा मांडला. बहुजन रयत परिषद ही संघटना कुठल्याही पक्षाशी बांधली गेलेली नाही. राज्यभरातील बहुजनांच्या प्रश्‍नांवर आक्रमक पवित्रा येणारी आमची संघटना आहे. आजवर राज्यभरात जिथे जिथे गोरगरिबावर अन्याय झाला तिथे बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून आम्ही आवाज उठविला आहे आणि यापुढेही उठविला जाईल, हिच बहुजन रयत परिषदेची खरी ओळख आहे, असे रोखठोक मतही गालफाडे यांनी व्यक्‍त केले.
यावेळी बहुजन रयत परिषदेचे राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिंधीच्या गप्पबशा भूमिकेवर टीका करताना गालफाडे म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आली असताना लोकप्रतिनिधी पुढे येऊन बोलत नाहीत, याची खंत आहे. काही प्रमाणात सामाजिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अन्याय विरोधात बोलतात व न्याय मागत आहेत.
ज्या जिल्ह्यात जो नेता अथवा पक्ष बहुजनांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवेल, त्यांना आमचा पाठिंबा राहिल. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळ अंतर्गत गोरगरीब युवकांना रोजगार निर्माण करावा यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. याशिवाय ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये अन्याय, अत्याचार वाढला आहे, त्या-त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायदान व्हावे, अशी मागणी देखील बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून आम्ही केली असल्याचे रमेश गालफाडे यांनी सांगितले.