#

Advertisement

Saturday, June 10, 2023, June 10, 2023 WIB
Last Updated 2023-06-10T17:41:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्रातून 2024 ला किती खासदार निवडून आणणार? फडणवीसांनी सांगितला आकडा

Advertisement

नांदेड : देशभरात भाजपकडून महा-जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडमध्ये आले आहेत. अमित शाह यांच्यासमोरच देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहेआमची स्पर्धा गुजरातसोबत आहे कोण जास्त खासदार निवडून आणतोय. 2014 ला आम्ही 43 खासदार निवडून आणले, 2019 ला 42 खासदार निवडून आणले. आता 2024 ला 43 पेक्षा जास्त खासदार निवडून आणू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्यासोबत व्यक्त केला.
'भाजपला नांदेड लोकसभेची जागा जिंकता येईल का नाही? याबाबत शंका आहे म्हणून अमित शाह यांची नांदेडमध्ये सभा आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. अशोकराव तुमची मजल टू जी, थ्री जी, सोनिया जीपर्यंत आहे. काही जण महाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्न चालेल असं म्हणत आहेत, पण महाराष्ट्रात फक्त एकच पॅटर्न चालतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पॅटर्न,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. '2014, 2019 प्रत्येक निवडणुकीत शरद पवार एकच सांगतात, मोदी लाट ओसरली पण रेकॉर्ड ब्रेक मतांनी मोदीजी निवडून येतात. काल हा देश मोदीजींच्या मागे होता, आज आहे आणि उद्याही असेल,' असा निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर साधला.