#

Advertisement

Saturday, June 10, 2023, June 10, 2023 WIB
Last Updated 2023-06-10T11:29:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात

Advertisement


देहू : संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दिंड्या-पताका घेऊन आलेल्या वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. टाळांच्या गजरामध्ये सर्व वातावरण भक्तीमय झालं आहे. या सोहळ्याच्या महापूजेसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, विधान परिषद आमदार उमा खापरे, खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित आहेत प्रस्थान सोहळ्याच्या पादुका पूजनासाठी देहूच्या मुख्य मंदिरात दाखल झाले आहेत. मुख्य मंदिराच्या सभा मंडपात पूजेला सुरुवात झाली आहे.वारकरी भाविकांमध्ये प्रंचड उत्साहाचे वातावरण आहे. टाळ-मृदुंगाच्या गजराने वातावरण भक्तीमय झाले आहे.