#

Advertisement

Tuesday, June 13, 2023, June 13, 2023 WIB
Last Updated 2023-06-13T16:04:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना नेत्यांना तंबी !

Advertisement

मुंबई :   मतदारसंघातील समस्या सोडवण्याऐवजी मुंबईला मंत्रालयात चकरा मारणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांगलचं सुनावलंय.आगामी काळात आपआपल्या मतदारसंघात तळ ठोकून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
राज्यात शिंदे सरकार सत्तेत येऊन एक वर्ष होत आलं आहे. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला वर्ष दीड वर्षाचा अवधी आहे. पण आगामी निवडणुकांची सत्ताधारी शिवसेनेनं धास्ती घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना चांगलीचं तंबी दिली आहे.मतदारसंघ सोडून वारंवार मुंबईला फेऱ्या मारणाऱ्या आमदार आणि खासदारांना मुख्यमंत्री शिंदेंनी खडेबोल सुनावले आहेत. वारंवार मुंबईला फेरा मारण्याऐवजी आपल्या मतदार संघात तळ ठोकून राहण्याची सूचना त्यांनी दिलीय. तसंच राज्य सरकारनं मंजूर केलेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचा आदेशही त्यांनी आपल्या आमदार, खासदारांना दिले आहे.