#

Advertisement

Thursday, June 29, 2023, June 29, 2023 WIB
Last Updated 2023-06-29T16:42:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें दिल्लीला ; मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

Advertisement

मुंबई :  राज्याचे पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीला जात असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संयुक्तपणे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. येणाऱ्या काळात लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चर्चा होऊ शकते. येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 2 किंवा 3 खासदरांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्याताही सूत्रांनी व्यक्त केली आहे. एक कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, केंद्रात मंत्रिपद देताना ज्येष्ठतेनुसार दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये गजानन कीर्तिकर आणि हेमंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर महिला म्हणून खासदार भावना गवळी यांचं नावही आघाडीवर आहे.