Advertisement
मुंबई : ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर आउटगोईंग सुरू आहे. यावेळी 1 जुलैच्या मोर्चाआधी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा आणखी एक निकटवर्तीयाने पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे राहुल कनाल हे येत्या 1 जुलै रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. गेल्या वर्षी राहुल कनाल यांच्या घरावर सीबीआयचा छापा पडला होता. तेव्हापासून राहुल कनाल हे शिवसेनेत फारसे सक्रिय नव्हते. युवासेनेत कार्यकारणी सदस्य राहुल कनाल नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. राहुल कनाल यांनी महिन्यापूर्वी युवासेना कार्यकारणीचा व्हॅाट्सअप ग्रुप सोडला होता. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते.
राहुल कनाल यांना उद्योजक म्हणून ओळखलं जातं. युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी आहेत. त्याशिवाय, वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार आहेत. महाविकास आघाडीची सत्ता असताना राहुल शिर्डी देवस्थान समितीवर सदस्य राहिले आहेत. कनाल हे मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य होते. त्याशिवाय शिक्षण समितीवरही त्यांची वर्णी लागली होती.
