Advertisement
मुंबई : शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेबाबत करण्यात आलेल्या सर्व्हेची एक जाहिरात वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आली होती. या जाहिरातीवरून वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये सुधारित जाहिरात छापण्यात आली. आता या जाहिरातीला भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून एक पोस्टर लावण्यात आले आहे. त्या पोस्टरवर भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता छापण्यात आली आहे.
बोटीचे वल्हे सुरक्षित हातात आहेत. त्यामुळे तुम्ही समुद्रातून सुखरूप बाहेर पडू शकतात. असा या कवितेचा अर्थ आहे. या पोस्टरमुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षित हातात असल्याचं सूचवायचं आहे का? अशा चर्चेला आता सुरुवात झाली आहे. 'सबल भुजाओं में रक्षित है नौका की पतवार चीर चले सागर की छाती पार करे मझधार' -अटल बिहारी वाजपेयीजी असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे.
