#

Advertisement

Thursday, June 15, 2023, June 15, 2023 WIB
Last Updated 2023-06-15T10:54:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एखाद्या जाहिरातीनं आम्हाला फरक पडत नाही..

Advertisement

पालघर :  शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेबाबत करण्यात आलेल्या सर्व्हेची एक जाहिरात वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आली होती. या जाहिरातीवरून वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये सुधारित जाहिरात छापण्यात आली. या जाहिरातीमुळे भाजपात नाराजीचं वातावरण असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता त्यावर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. ते पालघरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. 
आमचा प्रवास 25 वर्षांचा आहे, काल, आज आणि उद्याही आम्ही एकत्रच रहाणार आहोत. आम्ही खुर्चीसाठी नाही तर लोकांच्या कल्याणासाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे एखाद्या जाहिरातीनं आम्हाला फरक पडत नाही. हे सरकार अनेक क्रांतिकारी निर्णय घेत आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी या जाहिरातीवर दिली आहे.