Advertisement
नागपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. ते आज नागपुरात भारत राष्ट्र समिती बीआरएसच्या पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. यापूर्वी त्यांच्या नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरात सभा देखील झाल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. आता आज के. चंद्रशेखर राव हे नागपुरात भारत राष्ट्र समितीच्या पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत.
आज भारत राष्ट्र समितीच्या वतीनं नागपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. चंद्रशेखर राव हे आज नागपुरात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तसेच पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. या निमित्तानं के. चंद्रशेखर राव हे आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग नागपुरातून फुंकणार असल्याच पहायला मिळत आहे.
