#

Advertisement

Friday, June 16, 2023, June 16, 2023 WIB
Last Updated 2023-06-16T09:38:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच का ?

Advertisement

मुंबई : एखादा धडा तुम्ही वगळू शकता पण लोकांच्या मनातून तुम्ही सावरकर, हेडगेवार आणि कोणतेही स्वातंत्र्यसेनानी काढू शकत नाही.काँगेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा दुसर काही अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्यांकांच लांगुलचालन करण्याकरिता कर्नाटकचं सरकार घेत आहे. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच का ? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीमहाविकास आघाडीला केला.
कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएसचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे धडे वगळल्याने भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी यावरून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा दुसरं काही अपेक्षित नाही असं म्हटल आहे.
कर्नाटकात अभ्यासक्रमात बदल केला त्यावर उद्धव ठाकरेजी आता तुमची प्रतिक्रिया काय ? ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते सावरकरांच नाव पुसायला निघालेत. ते धर्मांतरणाला समर्थन द्यायला निघालेत, आता तुमचं मत काय? सत्तेकरीता तुम्ही हा समझौता केला, हे यातून स्पष्ट होत असल्याचं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले.. पण असे निर्णय घेतल्याने कोणाचही नाव जनतेच्या मानस पटलावरुन पुसू शकत नाही असंही फडणवीस यांनी म्हटल आहे..