#

Advertisement

Friday, June 16, 2023, June 16, 2023 WIB
Last Updated 2023-06-16T09:48:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार ?

Advertisement


छत्रपती संभाजीनगर: हभप इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून लिंगभेदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या वादानंतर इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात पोलिसात तक्रारीही दाखल झाल्या होत्या. आता या प्रकरणी इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करा असे आदेश दिले आहेत.
सम-विषम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगा-मुलगी होते असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर पोलिसात तक्रार दाखल केली होती. तसंच खालच्या कोर्टात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण सेशल कोर्टाने गुन्हा रद्द केला होता. सेशन कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. यावर हायकोर्टात सुनावणी झाली. आता हाय कोर्टाने इंदुरीकर महारांजांविरोधात गुन्हा दाखल करा असं म्हटल आहे.