Advertisement
पुणे : राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा करताच अजित पवार यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!' असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.
