#

Advertisement

Sunday, June 25, 2023, June 25, 2023 WIB
Last Updated 2023-06-26T01:26:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूर लोकसभेसाठी "बिआरयस" कडून ॲड.कोमल ढोबळे यांना "ऑफर"

Advertisement


पंढरपूर : भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड कोमल ढोबळे यांच्या संपर्कात बीआरएसचे नेते आहेत. बीआरएसकडून त्यांना सोलापूर लोकसभा उमेदवारीची ऑफर देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपुरातील कार्यक्रमात विधानसभेसाठी अभिजीत पाटील यांच्या नावाबाबत संकेत दिले होते. त्यानंतर भगीरथ भालके यांच्यावर राष्ट्रवादी सोडण्याबाबत समर्थकांकडून दबाव टाकण्यात आला. त्यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भगीरथ भालके यांनी स्टार प्रचारक म्हणून भूमिका बजावली. भगीरथ भालके बीआरएसच्या वाटेवर असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे, त्यामुळे संभाव्य २०२४ ची विधानसभा ते बीआरएसकडून लढवू शकतात, अशा परिस्थितीत सोलापूर लोकसभेची निवडणूक बीआरएसने लढवण्याचे निश्चित केले, तर या राखीव जागेसाठी आक्रमक आणि जनमानसामध्ये ओळख असलेला चेहरा देण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून होऊ शकतो. अॅड. कोमल साळुंखे यांनी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम केले आहे. टोलनाक्याच्या प्रश्नासोबतच महिलांचे प्रश्न मांडण्यातही त्या आग्रही आहेत. बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून दलित समाजासाठी कल्याणकारी योजना राबवताना त्यांनी कायमस्वरूपी समाज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा, यासाठी काम केले आहे. बीआरएस पक्षाची ध्येय धोरणेही शोषित वंचितांच्या विकासासाठी अनुकूल अशीच आहेत. सोलापूर शहरात हैदराबाद तेलंगणा भागातील असणारा मतदार, पंढरपूर-मंगळवेढा भागात ढोबळेंचा असलेला जनसंपर्क, मोहोळ या ठिकाणी शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असलेली जाळे सोबत भालकेंचा राजकीय उपयोग नाकारता येणार नाही. एकंदर अॅड. कोमल साळुंखे यांना बीआरएस चाचपणी करू शकतो. सध्या बीआरएसचे नेते अॅड. कोमल साळुंखे यांच्या संपर्कात असून त्यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे. याबाबत कोमल ढोबळे यांनी अधिकृत दुजोरा दिला नसला तरी बीआरएसला एक चर्चित चेहरा साळुंखेच्या रूपाने मिळू शकतो. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर भेटीतील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.