#

Advertisement

Monday, June 26, 2023, June 26, 2023 WIB
Last Updated 2023-06-26T11:59:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ठाकरे गटाच्या मोर्चात मनपा अधिकाऱ्याला मारहाण

Advertisement

 मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेच्या एच पूर्व वॉर्डवर मोर्चा काढला. अनिल परब यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम, कचरा, नालेसफाई तसेच पाण्याच्या समस्यांबाबत मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनिल परब यांनी शिवसेना शाखेवरील कारवाईवरुन पालिका अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला. अनिल परब पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. मारहाणीचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्या पालिसा अधिकाऱ्यांना शाखेवर कारवाई  केली होती. त्या अधिकाऱ्यांना अनिल परब यांच्यासमोरच मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.