#

Advertisement

Sunday, June 25, 2023, June 25, 2023 WIB
Last Updated 2023-06-25T14:04:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कष्टाने यशस्वी जीवनाचा पासवर्ड शोधावा

Advertisement


प्रा. लक्ष्मणराव ढोबळे...

 अर्ध शतकात शिक्षणाचा विस्तार झाला आहे. यामुळे शिक्षणाची रुंदी वाढली परंतु अंशतः शिक्षणाची खोली कमी झाल्याचे जाणवते. अशा परिस्थितीत माझ्या पोराने उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे असे टांगेवाल्यापासून रिक्षावाल्यापर्यंत वाटते. मोलकरीणीपासून सफाई कामगारापर्यंत माझ्या पोरांनी साहेब व्हावे अशी भावना सर्वसामान्य माणसात मोठ्या तडफेने आली आहे. वाट्टेल ते कष्ट उपसण्याची माता-पित्यांची भावना असून सर्वत्र शिक्षणाचा प्रसार झाला असून काही ठिकाणी कला शाखेचे वर्ग रिकामे पडतायत आणि उघडपणे सर्वत्र | विद्यार्थ्यांचा ओढा टेक्नीकलकडे वळला असून आयटी क्षेत्राची ओढ वाढत गेली आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी किंमत मोजून का होईना आपल्या पोराला चांगल्या ठिकाणी चांगल्या क्षेत्रात डमीशन मिळावे असेच प्रयत्न सुरू झाले आहेत.एकूणच आई-बापाची इच्छाशक्ती काही असली तरी मुलगा मात्र भविष्याचा वेध घेताना दिसतोय. आपल्याला जे हवे तेच करायचे, तसेच करीअर घडवायचे या भावनेतून शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी व्यक्त होताना दिसतोय. कारण हमीच्या ऊसतोडीच्या कामावर जाऊन अपार कष्ट करून मातीत खेळणारी आपली लेकरं मोठी व्हावीत असाच माता-पित्यांचा संकल्प आहे. दहावी पास झाल्यावर लेकरं मोठी झाली, कॉलेजात गेली. चमकोगिरीच्या नादात कॉलेजकुमार म्हणून वावरू लागली. याचा गरीब आई बापांना मोठा अभिमान - वाटत असतो. परंतु पुढे आपला पोरगा कुणाच्या संगतीत वाढतो आहे ? गौतमी पाटलाच्या गर्दीत सामील होतो आहे. कॉलेज बुडवून सैराटचं सामुदायिक तिकीट काढतो आहे. हे बज्याच धनिक बापांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे मोर्चात सामील झाला आणि चमकोगिरी करता करता पोलीसांच्या कृपादृष्टीने पेटत्या पोलीस कलमाचा धनी झाला. आणि मग आईने माझ्या बाळाने मोठा पगार माझ्या हाती द्यावा म्हणून जो संकल्प केला होता. आपल्या माता-पित्याचा वनवास संपावा, म्हातारपण आनंदात आनंदात घालवावे. असा संकल्प आईबापाने केलेला असतो. परंतु त्याला अचानक मोठी दृष्ट लागते. लेकराचे मोठी दृष्ट लागते. लेकराचे आयुष्यच काळोखाने कलंकीत होते.पोलीस कलमाच्या गराड्यात आंदोलकाच नुकसान होतं. एकदा पोलीस कलमाचा पाठलाग सुरु झाल की अवघं घर अडचणीत येतं. सुरुळीत संसार उध्वस्त होतो. एका क्षणात घडलेलं पंचवीशीत कव्हर घातलेलं करियर उध्वस्त होते आणि मातीमोल होते. चुक पोराची लेकाची परंतु किंमत मात्र अवघ्या घराला मोजावी लागते. ऐन उमेदीच्या काळात तारुण्याच्या धुंदीत प्रेमाच्या मस्तीत आई- बापाचे स्वप्न भंगते, हद्दपार होते. केवळ दाखवण्यासाठी आणि रुबाबासाठी किरकोळ मारामाज्या दगडफेक अंगलट येते. त्यामुळे आईबापाची,आजोबाची आयुष्यभर सांभाळलेली इमेज मातीमोल ठरते. म्हणूनच कोणतीही गोष्ट करण्याआधी तरुणाने दहावेळा विचार करावा. वयस्कर कवळी बसवलेल्या आईसाठी आजोबासाठी तरी सावध व्हावे आणि आयुष्य घडवावे. असे फार थोड्या तरुणांना वाटत असते. त्यामध्येच निर्माण झालेली प्रसार माध्यमं, साशल मेडिया त्यात पांढज्या गिधाडाने दिलेला कानमंत्र भुलीचे इंजक्शन दहावेळा तपासून बघितले पाहिजे. कानमंत्रच का पिसाळतोय याचे चिंतन झाले पाहिजे. मनाला आवर घालण्यापासून उनाडपणाचे खेळ बाजुला सारले पाहिजेत. दिसेल त्या मंदिरात जा आणि देवाच्या पादुकावर कपाळ टेकवून हात जोडून दहा अंक मोजा. बावरलेल्या मनाला आवरा. प्रसारमाध्यमातले तयार केलेले नाटकी ग्रुप हे आपल्या करिअरला घातक असून अभ्यासाची सजगता हाच जीवनाचा पासवर्ड आहे. असे ठरवून स्पर्धा परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. अनेक उत्तम असलेल्या ज्ञानाचा सराव करीत ज्ञानाच्या क्षेत्रात उच्च शिक्षणाचे संपादन केले पाहिजे. हीच आयुष्याची गुरुकिल्ली असून देव, देश आणि धर्म याच्या सावलीत राष्ट्रसेवा घडवणे हेच जीवनाचे श्रमसाफल्य आहे. आत्मसिध्दीच्या जोरावर खडतर आणि कष्टमय श्रमावर श्रध्दा ठेवूनच आपल्या दैवतासमोर संकल्प केला पाहिजे. आणि त्यामधूनच यशाचा मानकरी होणे सुलभ झाले पाहिजे.