Advertisement
सोलापुर : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पाय धरले आहेत. सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त जयंत पाटील आणि शहाजी बापू पाटील यांची भेट झाली. जयंत पाटील दिसताच शहाजी बापू पाटील यांनी त्यांचे चरण स्पर्श करून विचारपूस केली. सोलापुरातील बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही भेट झाली. या लग्न सोहळ्याला सुशील कुमार शिंदे, जयंत पाटील, शहाजी बापू पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
