Advertisement
नाशिक : राज्य सरकारने जाहिरात देऊन चूक केली. सध्याच्या सरकारमध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. सरकारमध्ये सर्वाधिक योगदान हे भाजपचे नाही, असे या जाहिरातीमधून समोर आले, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या जाहिरात प्रकरणावर भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी शिवसेना आणि भाजपमधील जाहिरात वादावर भाष्य केलं आहे.
शिंदे सरकारकडून देशात मोदी राज्यात शिंदे अशी जाहिरात देण्यात आली. या जाहिराती फडणवीस यांचा फोटो वगळण्यात आला होता. मुळात राज्य सरकारने जाहिरात देऊन चूक केली. मोठी संख्या यात भाजपची आहे. सरकारमध्ये सर्वाधिक योगदान हे भाजपचे नाही असे या जाहिरातीमधून समोर आले आहे, असं म्हणत पवारांनी युतीला डिवचलं आहे.
