#

Advertisement

Friday, June 16, 2023, June 16, 2023 WIB
Last Updated 2023-06-16T11:28:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

हिंद महासागरात भारताचे सामर्थ निर्माण करणाऱ्या नौदलाला कोटी कोटी प्रणाम : ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे

Advertisement


भोसरी : हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव भारतासाठी एक मोठं आव्हान बनत असताना या आव्हानाचा सामना करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाने गेल्या काही वर्षांत हिंदी महासागरात मित्र देशांच्या नौदलांसोबत सागरी युद्धाभ्यास केला हा अभ्यास इतका कठीण, खडतर आणि नौदलाची कसोटी पाहणारा असतानाही आपल्या जवानांनी यात आपली क्षमता वेळावेळी दाखवून दिली. याच जोरावर आपल्या भारतीय नौदलाने दोन विमानवाहू जहाजांसह हिंद महासागरात गस्त घालून जगाला आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे, त्याबद्दल नौदालाचे कोटी कोटी प्रणाम करीत जवानांचा शतश: आभार बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई यांनी मानले आहे.

राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. याबाबत ऍड. कोमलताई यांनी माहिती देताना सांगितले की, हिंद महासागरात चिनचे वाढते वर्चस्व मोडीत काढण्यासाठी युद्धाभ्यासाशिवाय पर्याय नसल्याची बाब लक्षात येताच. जानेवारी 2020 पासून आपल्या नौदालाने प्रत्यक्षात हिंद सागरातील युद्धाभ्यास वाढविला. यातही "पेसेक्‍स' नामक युद्धाभ्यास महत्त्वाचा ठरला. भारत आणि अमेरिकेच्या नौदलाने या 'पेसेक्‍स' युद्धसरावात भारतीय नौदलाची युद्धनौका शिवालिक, हेलिकॉप्टर्स आणि समुद्रावर पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पी8आई विमानांनी, अमेरिकन नौदलाच्या "यूएसएस थियोडोर रुझवेल्ट कॅरिअर स्ट्राइक ग्रुपसोबत सहभाग घेतला होता. यात कॅरिअर स्ट्राइक ग्रुप नौदलाचा एक मोठा ताफा ज्यामध्ये विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, युद्धनौका आणि इतर बोटींचा सहभाग होता.

याशिवाय भारतीय नौदलाने ओमानच्या रॉयल नेव्हीसोबत "नसीम-अल-बकर' नावाचा युद्धाभ्यास केला
सप्टेंबर 2020 मध्ये भारतीय नौदलाने रशियन फेडरेशन नेव्हीसोबत "इंद्रा नेव्ही' नावाचा युद्धसराव केला. यात रशियाच्या युद्धनौका ऍडमिरल ट्रिब्यूट्‌स, ऍडमिरल विनोग्रोडोव आणि ऍडमिरल बोरिस बुटोमा सहभागी होत्या. सप्टेंबरमध्येच भारतीय नौदलाने जपानच्या मेरिटाईम सेल्फ डिफेंस फोर्ससोबत अरबी समुद्रात झालेल्या युद्धाभ्यासात भाग घेतला होता. ऑक्‍टोबर 2020 मध्ये भारतीय नौदलाने बांग्लादेशी नौदलासोबत 'बोंगोसागर' नावाच्या युद्धसरावात भाग घेतला होता. त्यानंतर भारताने सिंगापूरसोबत "सिम्बेक्‍स', तर नोव्हेंबर 2020 मध्ये अनेक देशांसोबत "मालाबार' युद्धसराव हिंदी महासागरात केला होता. त्यानंतरच्या काळात आजपर्यंत भारतीय नौदलाने फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या नौदलासोबत 'पेसेक्‍स' युद्धसराव बंगालची खाडी, हिंदी महासागराचा पुर्वेकडील भाग आणि अदनमानच्या खाडीत केलेला आहे, याच सरावाच्या बळावर आता भारतीय नौदलाने दोन विमानवाहू जहाजांसह हिंद महासागरात आपल्या सागरी सिमांवर गस्त घालून चिनला आपले सामर्थ थेट दाखवून दिले आहे.
भारताच्या या शक्तीप्रदर्शनाचे जगभरातून कौतुक होत आहे. भारताचे हे यश मोठे असल्याचे अमेरिकन लष्करी तज्ज्ञांचे मत आहे. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत रशिया आणि चीन भारतापेक्षा खूप पुढे आहेत, पण त्यांनीही असा पराक्रम अद्याप केलेला नाही. इटली, जपान आणि ब्रिटनकडेही प्रत्येकी दोन विमानवाहू युद्धनौका आहेत, पण त्यांनाही असा पराक्रम करता आलेला नाही, याच कारणामुळे आपल्या नौदलाचा अभिमान असल्याचे ऍड. कोमलताई साळुंखे यांनी सांगितले.

म्हणून चिनला गप्प बसविणे गरजेचे होते...
चीनने गेल्या दशकात हिंदी महासागर परिसरात आपली उपस्थिती वाढवली होती.
हिंदी महासागरात चीन एक मोठा धोका बनत चालला होता.
हिंदी महासागर चिनच्या हालचालींवर लक्ष वाढविणे गरजेच ठरले होते.
चीनच्या नौदलाने तस्करीवर निर्बंध आणण्याच्या नावावर हिंदी महासागरात प्रवेश केला होता.
चीनने हिंदी महासागरातील रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या परिसरात त्यांची उपस्थिती निश्‍चित केली होती.
चीन आणि भारत यांच्या सागरी सीमा एकमेकांना लागून असल्याने चिन समुद्रही गिळतो आहे.
हिंदी महासागरात चीनची उपस्थिती जिबूतीपासून अफ्रिकेपर्यंत पोहोचली आहे.