#

Advertisement

Wednesday, June 21, 2023, June 21, 2023 WIB
Last Updated 2023-06-21T10:05:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सटाणा शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा

Advertisement

बहुजन रयत परिषदेची मागणी

सटाणा : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा शहरात उभारण्यात यावा यासाठी सटाणा नगर परिषेदेचे मुख्याधिकारी व तहसीलदारांना बहुजन रयत परिषद सटाणा, ता. सटाणा, जि. नाशिकच्या वतीने निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या. या प्रसंगी नाशिक जिल्हा अध्यक्ष नानासाहेब खंडाळे, राज्य कार्यकारीणी सदस्य साहेबराव शृंगार, जी.प. सदस्य बाळासाहेब शिरसाट, ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक अशोक साठे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय जाधव, जिल्हा सरचिटणीस नानाभाऊ जाधव, सटाणा तालुका अध्यक्ष अरुण शेलार, सटाणा शहर अध्यक्ष जितेंद्र देवरे, कळवण तालुका अध्यक्ष युवराज जमधडे, विशाल बकुरे, महिला तालुका अध्यक्षा पूनम वाघ, जिल्हा संघटक नानाजी केदारे, जिल्हा कार्याध्यक्ष रोहिदास शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष अहिरे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रविण देवरे, सटाणा तालुका संघटक मुकेश पवार, रमेश शेलार, पवन देवरे, अनिल देवरे, सचिन देवरे, भारत गांगुरडे, शंकर बाशिंगे, अजय संदानशिव, मोहित कांबळे, निखिल पवार, विजय पवार, पंढरी देवरे, विजय देवरे, रोशन केदारे, उमेश पाथरे, गणेश पाथरे, किशोर पाथरे, सागर ठाकरे आदी समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.