#

Advertisement

Wednesday, June 21, 2023, June 21, 2023 WIB
Last Updated 2023-06-21T10:14:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

संजय राऊत, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे

Advertisement

मुंबई : संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजीत पाटकर यांच्याशी संबंधित प्रकरणी ईडीने राज्यात धाडसत्र सुरू केलं आहे. कोविड काळातील कंपनीच्या घोटाळा प्रकरणी छापे टाकले जात आहेत. मुंबईत पंधराहून अधिक ठिकाणी छापा टाकला जात असून बीएमसी कोविड घोटाळ्याशी संबंधित हे छापे आहेत. बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिन्स उभारण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकले गेले आहेत.
ईडीने प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना ही याआधी चौकशीसाठी बोलावले होते. नुकतीच मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची चौकशी लावण्याची घोषणा केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना सचिव सुरेश चव्हाण, आय़एएस संजीव जयस्वाल यांच्यासह १६ ठिकाणांवर छापा टाकला आहे. सूरेश चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्याच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचले आहे.
भाजपनेते प्रविण दरेकर यांनी या धाड प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, कोविडच्या काळात त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जो घोटाळा ,भ्रष्टाचार झाला होता त्यावरून कारवाई होत असेल. त्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जो खर्च झाला त्या काळात जे अधिकारी होते त्यांनी खर्च कसा केला याची चौकशी होत असेल.