#

Advertisement

Tuesday, June 20, 2023, June 20, 2023 WIB
Last Updated 2023-06-20T13:14:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भारत राष्ट्र समितीचे नेते हर्षवर्धन जाधव निवडणूक लढवणार

Advertisement

छत्रपती संभाजीनगर :  भारत राष्ट्र समितीचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये भावी खासदार हर्षवर्धन जाधव असा मजकूर असलेले बॅनर झळकले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
गेली लोकसभेची निवडणूक हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांना मोठ्या प्रमाणात मतं देखील मिळाली होती. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना बसल्यानं त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. गेल्या लोकसभा निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 83 हजारांहून अधिक मतं मिळवली होती.
र्षवर्धन जाधव यांनी हैदराबादमध्ये जाऊन तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. आगमी लोकसभा आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीआरएसकडून सध्या राज्यात जोरदार तयारी सुरू आहे.