#

Advertisement

Thursday, June 22, 2023, June 22, 2023 WIB
Last Updated 2023-06-22T11:40:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादीत आता प्रदेशाध्यक्ष पदावरुन संग्राम

Advertisement


मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदावर पाहिजे तसा काम करत नसल्याची चर्चा अनेक नेत्याकडून ऐकत आहे. विरोधी पक्षनेते नेते पद सोडण्याची माझी तयारी आहे. मला संघटनामध्ये कोणतीही जबाबदारी द्यावी अशी मागणी काल शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25व्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात केली. अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पदी रस नाही. एनसीपी पक्षात प्रदेश अध्यक्ष कोण होणार यावर सद्या पक्षात घमासान पहायला मिळत आहे. एनसीपी पक्षात प्रदेश अध्यक्ष बदलण्याची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे. जयंत पाटील यांना बदलवून काँग्रेस पक्षाच्या फॉर्म्युला अनुसार अध्यक्ष व्हायला पाहिजे अशी भुमिका एनसीपी नेते छगन भुजबळ यांनी मांडली आहे. विरोधी पक्षनेता मराठा असेल तर प्रदेश अध्यक्ष ओबीसी असला पाहिजे अशी मागणी आज भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ यांनी थेट ओबीसी नेत्यांची नावेच सांगितली आहे.