#

Advertisement

Wednesday, June 14, 2023, June 14, 2023 WIB
Last Updated 2023-06-14T11:46:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भावी क्रिकेटर्सशी ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा संवाद

Advertisement

मंगळवेढा : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंगरगाव येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेतील पारितोषिक वितरणानंतर बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ फायटर क्‍लब नंदेश्वर, डीसीसी डोंगरगाव आणि मारापूर या संघाना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील या भावी क्रिकेटरर्सशी संवाद साधत त्यांच्या खेळांबाबतच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामीण भागातील खेळाडुंनीही राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील सामने खेळावेत, अशा संघामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्‍त करीत खेळाडुंना मदत करण्याबाबत आश्‍वासन दिले. यावेळी आयोजक विलास पाराध्ये, संजय मस्के, सुभाष मस्के, संगमेश्वर मस्के, तुकाराम मस्के यांच्यासह स्थानिक खेळाडू उपस्थित होते.


स्लेल्फी विथ कोमलताई मंगळवेढा तालुक्‍यातील ग्रामीण भागातील अनेक खेळाडु या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अनेक लहान वयोगटातील खेळाडुंनी ऍड. कोमलताई यांच्याबरोबर सेल्फी काढत त्यांच्याबराबरेचे फोटो आपल्या स्टेटसवर ठेवले. या कार्यक्रमाची चर्चा अवघ्या मंगळवेढ्यात होती.