#

Advertisement

Wednesday, June 14, 2023, June 14, 2023 WIB
Last Updated 2023-06-14T12:09:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाविकासआघाडीत नवी खडाखडी?

Advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या  काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये  काँग्रेसची परिस्थिती चांगली असल्याचं निरिक्षण नोंदवण्यात आलं आहे. दुसरीकडे विदर्भातल्या 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचीही नजर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निहाय आढावा बैठक पार पडली. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विदर्भातील 10 लोकसभा मतदार संघावर चर्चा केली गेली. एनसीपीने बुलढाणा, यवतमाळ- वाशीम,चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, गोंदिया-भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या लोकसभा मतदार संघावर चर्चा केली. एनसीपीने काँग्रेस पक्षाकडील काही लोकसभा मागण्याची तयारी केली आहे, यामध्ये अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वर्धा, रामटेक या जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे मागितल्या जाऊ शकतात.