#

Advertisement

Wednesday, June 7, 2023, June 07, 2023 WIB
Last Updated 2023-06-07T11:58:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती

Advertisement

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल कार्यालयाने याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे तब्बल एक वर्षानंतर गोसावी यांच्या रूपाने पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज केलेल्या 27 उमेदवारांमधून कुलगुरू शोध समितीने पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुरेश गोसावी, पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोले आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी या पाच उमेदवारांची नावे शॉर्ट लिस्ट केली होती. त्यातून डॉ. सुरेश गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी  नियुक्ती  केली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांनी डॉ संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.