Advertisement
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कालपासून छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शहराच्या नावाला मला संभाजीनगर म्हणायचं नाही तर औरंगाबादचं म्हणायचं आहे, असं विधान केले आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील सौहार्द या कार्यक्रमात उपस्थीत असताना पवार बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या प्रवासा संदर्भात काढलेल्या आठवणीत त्यांनी हे विधान केले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचा विषय खूप वर्षांपासून गाजत होता. महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या काळात औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांचं नामांतर केलं. नंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने तो आदेश रद्द करुन नव्याने आदेश काढला. पवारांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
