Advertisement
छत्रपती संभाजीनगर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीनंतर राजकीय वतुर्ळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या भेटीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पंकजाताई आमच्याकडे आल्या तर स्वागतच असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या सात- आठ महिन्यानंतर असे विधान करतच असतात, आणि त्यानंतर लगेचच त्या माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला अशी प्रतिक्रिया देतात. पंकजा मुंडे या वजनदार नेत्या आहेत. सगळ्याच पक्षांना वाटते त्यांनी आपल्या पक्षात यावं. पंकजाताई आमच्याकडे आल्या तर त्याचं स्वागतच आहे. पण तसे होणार नाही, आम्हाला सोबत काम करायचं आहे.
