#

Advertisement

Saturday, June 17, 2023, June 17, 2023 WIB
Last Updated 2023-06-17T17:12:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिवसेना वर्धापन दिनाआधीच ठाकरेंना धक्का

Advertisement

मुंबई : शिवसेनेचा वर्धापन 19 जूनला दिन आहे, त्याआधीच उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. मातोश्रीमध्ये जाऊन शिशिर शिंदे यांनी त्यांचं राजीनामा पत्र सुपूर्द केलं आहे. 
पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत शिशिर शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. 19 जून 2018 साली शिशिर शिंदे यांची शिवसेनेत घरवापसी झाली होती. घरवापसीनंतर 4 वर्ष त्यांना राजकीय पुनर्वसनासाठी वाट पाहावी लागली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिशिर शिंदे यांची पक्षाच्या उपनेतेपदी वर्णी लागली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातल्या घडामोडींमध्ये शिशिर शिंदे यांना उपनेते करण्यात आलं होतं.